याला काय म्हणावं...?
महेश पठाडे
rhythm00779@gmail.com
व्हॉट्सअॅप असो वा फेसबुक... सोशल मीडियावर काही पोस्ट फिरवताना सुरुवातीला एक वाक्य असतं..
rhythm00779@gmail.com
व्हॉट्सअॅप असो वा फेसबुक... सोशल मीडियावर काही पोस्ट फिरवताना सुरुवातीला एक वाक्य असतं..
ते म्हणजे-
कोणी लिहिलंय माहिती नाही, पण जे लिहिलंय ते खूप सुंदर आहे...
कोणी लिहिलंय माहिती नाही, पण जे लिहिलंय ते खूप सुंदर आहे...
सोशल मीडियावर अशा अनामिकांच्या अनेक लेख, कवितांचा मारा होत असतो... हे असं कशामुळे होतं? कोण या अनामिकांची नावं पुसून टाकत आहेत? अनेक जण इतरांच्या पोस्ट स्वतःच्या नावाने खपवतात... तसा अनुभवही अनेकांना आला आहे. आपल्याच पोस्ट आपल्याला दुसऱ्याच्या नावाने पाहायला मिळतात. काही महाभाग तर वपुर्झातील विचार पुलंच्या नावावर, तर पुलंचे विचार आणखी भलत्याच्याच नावाने फॉरवर्ड करतात... हे सातत्याने होत राहिलं तर इंद्राणीच्या नात्यागोत्यासारखं कोणी काय लिहिलंय याचा घोळ होत राहील.
आता हेच पाहा ना
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
ही कविता अनेकांनी वाचली, ऐकली असेल. पण या कवितेचा मूळ कवी स. ग. पाचपोळ आहेत हे अनेकांना माहितीच नाही. अनेक जण तर नारायण सुर्वेंचंच नाव घेत आहेत. ही चूक आधी कोणी तरी केली असेल, पण त्याला बळ दिलं अभिनेता जितेंद्र जोशी याने. मुंबईतील एका पोलिस कार्यक्रमात त्याने नारायण सुर्वे यांचं नाव घेतलं आणि ती व्हिडीओ क्लीप व्हॉट्सअॅपवर इतक्या वेगाने पसरली, की मूळ लेखक दृष्टीआड गेला.
वेबसाइट, ब्लॉगसह सोशल मीडियावरील टिचक्या मारणाऱ्यांनीही नारायण सुर्वे यांचंच नाव माझी माय कवितेला दिलंय. स. ग. पाचपोळ कोणाला माहीतच नाहीत. हे किती दुर्दैव!!! स. ग. पाचपोळ टाकळी पारसकार (जि. बुलडाणा, ता. जळगाव जामोद) येथील मूळचे. आज त्यांची कविता इतकी लोकप्रिय असताना पाचपोळ दुर्लक्षितच राहिले. आंधळेपणाने फॉरवर्ड केलेल्या पोस्टमुळे मूळ लेखकाला किती यातना होत असतील याचा तरी किमान विचार करावा एवढंच म्हणावंसं वाटतं.


Comments
Post a Comment
Please follow me