Kheliyad

Advertisement
Diwali Spacial 2019

Jagmohan to Jagjit singh (part 6) : जगजितसिंग यांना 70 च्या दशकात मिळाली होती 80 हजारांची रॉयल्टी

November 02, 2019 · · comments

Jagjit Singh Life Story,jagjit singh songs,jagjit,singh,best of jagjit singh,jagjit singh hits,jagjit singh (singer),jagjit singh & chitra singh,best of jagjit singh ghazals,jagjit singh (musical artist),best of jagjit singh songs,jagjit singh mix,jagjit singh best,jagjit singh gazal,india jagjit singh,jagjeet singh,legend jagjit singh,jagjit singh ghazal,chitra singh,jagjit singh jukebox,jagjit singh,jagjit singh ghazals,jagjit singh songs,jagjit singh bhajans,chitra singh,jagjit singh hits,jagjit singh death,jagjit singh hit ghazals,best of jagjit singh ghazals,jagjeet singh,jagjit singh movie songs,jagjit singh hit songs,jagjit singh sad songs,jagjit singh romantic songs,jagjit singh (singer),jagjit singh duets,jagjit singh album,jagjit singh ghazal,jagjit singh albums,jagjit singh son,jagjit singh ghazals,jagjit singh songs,jagjit singh bhajans,jagjit singh death,chitra singh songs,tribute to jagjit singh,jagjit,chitra singh,jagjit singh wife,jagjit singh live,singh,jagjit singh interview,jagjit singh albums,jagjit singh family,jagjit singh and chitra singh ghazals,jagjit singh ghazals close to my heart,jagjit singh movie songs,jagjit singh's 77th birthday,जगजीतसिंग मृत्यू,जगजितसिंग मृत्यू,जगजीतसिंग यांच्या मुलाचा मृत्यू,जगजीतसिंग यांचा मुलगा विवेक
Jagjit Singh life story (part 6)


kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी...

जावेद अख्तर यांनाही ही नज्म खूप आवडते. त्यांनी पहिल्यांदा ही नज्म ऐकली ती अमिताभ बच्चन यांच्या घरी. त्या वेळी जावेद अख्तर यांचं नेहमीच त्यांच्याकडे येणं-जाणं असायचं. तेही कधी अख्तर यांच्याकडे यायचे. त्या वेळी रविवारी असेच एकदा अमिताभ यांच्या घरी जावेद अख्तर गेले. त्या वेळी अमिताभ त्यांना म्हणाले, ''मी तुम्हाला एक अल्बम ऐकवतो.'' त्यांनी तो प्ले केला आणि ही सुरेल नज्म कानी पडली. जावेद अख्तर यांनी पहिल्यांदाच हा आवाज ऐकला. तोपर्यंत जगजितसिंग ही काय चीज आहे हे त्यांना अजिबात माहीत नव्हतं.


जावेद अख्तर यांनी कुतूहलाने विचारलं, "कोण आहेत हे?"

अमिताभ बच्चन म्हणाले, "हे जगजितसिंग.."

खरोखर जगजितसिंग यांच्या आवाजातली बात निकली आणि दूर तलक गेली...

त्या वेळी एलपी रेकॉर्ड होणे नव्या कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट होती. 'अनफॉरगेटेबल्स' हा अल्बम अविस्मरणीयच होता. तो विस्मरणात कधीच गेला नाही. त्या काळात ही मोठी क्रांती होती. संगीताचा चेहरामोहराच बदलला. अर्थात, या अल्बमची लोकप्रियता पाहायला जगजित आणि चित्रा भारतातच नव्हते. ते एका शेख यांच्या आमंत्रणावरून कुवेतला गेलेले होते. कुवेतमधील शानदार मैफली गाजवल्यानंतर दुबई, नंतर फ्रँकफर्ट, लंडनला रवाना झाले. सहा महिन्यांनंतर जेव्हा जगजित आणि चित्रा मायदेशी परतले तेव्हा तर ते थक्कच झाले. 'अनफॉरगेटेबल्स'ने सगळे विक्रम मोडीत काढले. जगजित-चित्रा मायदेशी येताच एचएमव्हीने 80 हजारांचा रॉयल्टीचा धनादेश त्यांच्या हाती सोपवला. 1976 चा तो काळ. त्या वेळी 80 हजार रुपये म्हणजे छोटी रक्कम नव्हती. जगजित-चित्रा यांना जणू काही खजानाच मिळाला होता. भारतातील गझलविश्वातली ती एक खामोश क्रांती होती.

या 'अनफॉरगेटेबल्स' अल्बमचे कव्हर चित्र तयार केले होते चित्रा यांचे पहिले पती देबू दत्ता यांनी. या रेकॉर्डचा आणखी एक फायदा झाला. जगजित यांच्या वडिलांची नाराजी कायमची दूर झाली. आता वडिलांना जगजितसिंग यांचा अभिमान वाटू लागला. ते स्वतःही जगजितच्या गझला गुणगुणायचे. एका मुलाला आणखी काय हवं होतं! या वेळी जगजित यांनी निश्चित केलं, की आता मुलगा विवेकची आजी-आजोबांशीही भेट व्हायला हवी. जगजित चित्रासोबत लुधियानाला गेले, जेथे त्यांचे आईवडील राहत होते. घरी जगजित यांचे भरपूर लाडकौतुक झाले. त्यानंतर हा परिवार कोलकात्याला गेला.

लग्नानंतर चित्राच्या आईवडिलांशी जगजित यांची एकदाही भेट झालेली नव्हती. विशेष म्हणजे, त्यांना चित्राचा घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाचंही माहीत नव्हतं. त्यांना एवढेच माहीत होतं, की चित्रा देबू दत्ता यांच्यासोबत खूश आहे. मात्र, जेव्हा कळलं की चित्राच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत, ते व्हा ते स्तब्धच झाले. मात्र, जगजितला भेटल्यानंतर त्यांना कल्पना आली, की मुलीने घेतलेला निर्णय चुकीचा नाही. पुढे त्यांनी नेहमीच जगजित यांना मुलासारखं मानलं.

किशोरावस्थेपासूनच जगजित यांचा सुफियाना आणि आध्यात्मिकतेकडे अधिक कल होता. शिमल्यात पंजाबचे लोकप्रिय कवी शिवकुमार बटालवी यांना ते भेटले. या भेटीतच जगजित यांना त्यांच्या कवितांनी अक्षरशः वेड लावलं. त्याच वेळी त्यांच्या मनात एक सुप्त अपेक्षा होती, की कधी तरी आपल्याला बटालवी यांच्या कवितांच्या गायनाची संधी मिळो. आयुष्यात अशा संधी अवश्य येतात जेव्हा तुम्ही शिखराकडे जात असतात, तेव्हा समाज तुमच्या इच्छेपुढे नतमस्तक होतो; पण जोपर्यंत तुम्ही अनोळखी असतात तेव्हा किती तरी इच्छा-आकांक्षा दम तोडतात. 'अनफॉरगेटेबल्स'ने लोकप्रियतेचे विक्रम मोडल्यानंतर जगजित सिंग यांनी एचएमव्हीसमोर बटालवी यांच्या कवितांच्या गायनाचा रेकॉर्ड काढण्याचा प्रस्ताव ठेवला. जगजित सिंग यांच्या लोकप्रियतेमुळे एचएमव्हीचा त्यांच्यावर विश्वास वाढला होता. कंपनीने जगजित यांच्या प्रस्तावाला लगेच मंजुरीही दिली. जगजित-चित्रा यांच्या या अल्बमचे नाव होते- 'बिरहा दा सुलतान सदाबहार.' या अल्बमचे कव्हर डिझाइन केले होते प्रसिद्ध चित्रकार इमरोज यांनी. हा काळ होता 1978 चा.

जगजित आणि चित्रा यांचे आयुष्य छान चालले होते. दोघांचेही एकापेक्षा एक हिट अल्बम येत होते. लोक तर त्यांच्या अल्बमचे दिवाने झाले होते. जेवढे ते भारतात लोकप्रिय होते त्यापेक्षा अधिक लोकप्रियतेचे शिखर विदेशात गाठले होते. त्यांच्या लोकप्रिय अल्बममधून एका अल्बमची किंवा गझलेची निवड करणे प्रचंड अवघड आहे. सर्वच अल्बममध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग केले होते. त्या वेळी 'काळा तवा' कालबाह्य ठरला आणि ऑडियो कॅसेटने क्रांती घडवली. प्रत्येक कॅसेटचे कव्हर काही पानांचे असायचे. त्यावर सगळ्याच गझला छापलेल्या असायच्या. ही कल्पना जगजितसिंग यांनीच पहिल्यांदा लोकप्रिय केली. भारतातील घराघरांत गझल पोहोचविण्याची जगजितसिंग यांची ही कल्पना अद्भुतच म्हणायला हवी. जगजित- चित्रा यांनी काही गझला अशाही गायल्या, ज्या अल्बमच्या माध्यमातून संगीतप्रेमींपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. त्या अप्रतिम गझलांपैकी एक म्हणजे...


jagmohan life story
Jagmohan to Jagjit Singh (Part 6)

सर जिस पे न झुक जाए उसे दर नहीं कहते
हर दर पे जो झुक जाए उसे सर नहीं कहते

'बिरहा दा सुलतान'नंतरच्या दहा वर्षांत जगजित आणि चित्रा या दोघांचे 16 अल्बम आले. या सर्व अल्बमनी लोकप्रियतेचे विक्रम रचले. त्यांनी देश-विदेशांत जेवढ्या गझला गायल्या त्या आता कालौघात धूसर होत आहेत. मात्र, विदेशातील काही दर्दी जाणकारांनी त्यांच्या काही गझला आजही जपून ठेवल्या आहेत. भारतातही अनेकांना या गझलांविषयी माहिती नसेल. त्यांच्या अनेक गझला अशा आहेत ज्या विदेशातच गायल्या आहेत. भारतात त्यांनी कधी त्या सादर केलेल्या नाहीत. एका दर्दी रसिकाने त्यांना विचारलं होतं, की ''तुम्ही विदेशात ज्या गझल पेश करतात, त्या भारतात कधी सादर केल्या नाहीत. उलट विदेशात सादर केलेल्या गझल तर किती तरी पटीने सुरेख होत्या. मात्र भारतात तुम्ही पंजाबी धाटणीच्याच गीतांना प्राधान्य दिलं. असं का?'' त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, ''ती एक्स्पोर्ट क्वालिटी होती!'' जगजित सिंग यांनी प्रेक्षकांची नस ओळखलेली होती. त्यामुळे कुठे कोणत्या गझलांना दाद मिळेल आणि कोणत्या गझलांना नाही, याची त्यांना कमालीची जाण होती. कदाचित यामुळेच त्यांनी विदेशात गायलेल्या गझला भारतात कधीच सादर केल्या नाहीत. त्यांच्या अनेक रेकॉर्डची लोकप्रियता दूरपर्यंत पोहोचली होती. 1979 मध्ये 'कम अलाइव्ह इन अ लाइव्ह' ही रेकॉर्डही प्रचंड गाजली.

जगजितसिंग यांचे सहयोगी कलाकार साउंड इंजिनीअर दमन सूद यांनीही अल्बमविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणतात, की 'कम अलाइव्ह..' ही रेकॉर्डिंग जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा असे वाटेल की आपण लाइव्ह कॉन्सर्ट ऐकतोय. मुळात ती लाइव्ह रेकॉर्डिंग अजिबात नव्हती. जगजित यांनी स्टुडिओमध्ये लोकांना बोलावून त्यांची उत्स्फूर्त दाद रेकॉर्ड केली. नंतर जगजितसिंग यांनी गझल रेकॉर्ड करून त्यात लोकांची उत्स्फूर्त दाद मिक्सिंग केली. ही जीनिअस आयडिया जगजितसिंग यांची होती. म्हणजे काळाची पाऊले त्यांनी किती पूर्वी ओळखली होती. आजही अशा प्रकारची मिक्सिंग होते. मात्र, 80 च्या दशकात असा विचार करणारे जगजित सिंग काळाच्या किती पुढे होते याचे हे उदाहरण. 


Jagjit Singh Life Story,jagjit singh songs,jagjit,singh,best of jagjit singh,jagjit singh hits,jagjit singh (singer),jagjit singh & chitra singh,best of jagjit singh ghazals,jagjit singh (musical artist),best of jagjit singh songs,jagjit singh mix,jagjit singh best,jagjit singh gazal,india jagjit singh,jagjeet singh,legend jagjit singh,jagjit singh ghazal,chitra singh,jagjit singh jukebox,jagjit singh,jagjit singh ghazals,jagjit singh songs,jagjit singh bhajans,chitra singh,jagjit singh hits,jagjit singh death,jagjit singh hit ghazals,best of jagjit singh ghazals,jagjeet singh,jagjit singh movie songs,jagjit singh hit songs,jagjit singh sad songs,jagjit singh romantic songs,jagjit singh (singer),jagjit singh duets,jagjit singh album,jagjit singh ghazal,jagjit singh albums,jagjit singh son,jagjit singh ghazals,jagjit singh songs,jagjit singh bhajans,jagjit singh death,chitra singh songs,tribute to jagjit singh,jagjit,chitra singh,jagjit singh wife,jagjit singh live,singh,jagjit singh interview,jagjit singh albums,jagjit singh family,jagjit singh and chitra singh ghazals,jagjit singh ghazals close to my heart,jagjit singh movie songs,jagjit singh's 77th birthday,जगजीतसिंग मृत्यू,जगजितसिंग मृत्यू,जगजीतसिंग यांच्या मुलाचा मृत्यू,जगजीतसिंग यांचा मुलगा विवेक
Jagjit Singh Ghazals
तलत अझिझ यांनी 1979 मध्ये ऑल इंडिया रेडिओशी अल्बमचा करार केला, तेव्हा त्यांनी जगजितसिंग यांचीच मदत घेतली. तलत यांनी जगजित यांना फोन करून विचारलं, की मी एक अल्बम काढतोय. तुम्ही त्यासाठी कम्पोझिशन्स कराल का? जगजितसिंग लगेच हो म्हणाले. 'जगजितसिंग प्रेझेंट्स तलत अझिझ' हा तो अल्बम. नंतर 'मै और मेरी तनहाई' असे अनेक हिट अल्बम जगजितसिंग यांनी दिले. उर्दू साहित्यातील लोकप्रिय नाव म्हणजे डॉ. बशीर बद्र. त्यांच्याही अनेक गझला जगजितसिंग यांनी गायल्या.

(क्रमशः)

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.