Kheliyad

Advertisement
Inspirational Sport story

हात गमावल्यानंतरही सर्फिंग करणारी ही महिला खेळाडू कोण?

January 01, 2020 · · comments


bethany hamilton surfer
bethany hamilton surfer  : सागरी लाटांना आव्हान देणारी या खेळाडूला एक हात नसतानाही सर्फिंग सहजपणे करते.  




M. 8087564549

      www.linkedin.com/in/maheshpathade03    

bethany hamilton surfer
सागरी लाटांना आव्हान देणाऱ्या बेथानी हॅमिल्टनची कहाणी जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील हवाई येथे जन्मलेली बेथानी एक उत्तम सर्फर आहे. सर्फर हा मुळातच आव्हानात्मक खेळ. उंचच उंच लाटांवर स्वार होत सर्फिंग करणे सोपे मुळीच नाही. प्रशांत महासागराच्या मध्यात असलेल्या हवाईत जन्मलेल्या बेथानीला सागराच्या लाटांचं भय ते काय! बेथानी वयाच्या सातव्या वर्षापासून सर्फरवर स्वार होण्यास शिकली. मात्र वयाच्या वयाच्या १३ व्या वर्षी तिच्यावर एक भयंकर प्रसंग गुदरला. २००३ मध्ये मित्रासोबत सकाळी सर्फिंगचा आनंद लुटताना एका अजस्त्र शार्कने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शार्कने तिचा डावा हात खांद्यापासूनच विलग केला. तिच्या मित्राने प्रसंगावधान राखत तिला किनाऱ्यावर आणले. मात्र, या दरम्यान तिच्या शरीरातील साठ टक्के रक्त वाया गेले. या प्रसंगानंतरही बेथानी खचली नाही. तीन- चार आठवड्यांतच बेथानी सागरी लाटांना आव्हान देण्यासाठी पुन्हा सर्फिंग करू लागली.

सुरुवातीला तिने एक विशिष्ट प्रकारचा बोर्ड बनवून घेतला, जो मानकानुसार लांबीने मोठा आणि काहीसा जाड होता. त्यामुळे त्यावर ती उजव्या हाताने नियंत्रण राखू शकत होती. तिने कोणाच्याही मदतीशिवाय सर्फिंगवर पूर्ववत नियंत्रण मिळवले. आता बेथानी डाव्या हाताशिवाय सर्फिंग करू शकत होती. दहा जानेवारी २००४ मध्ये तिने पहिल्यांदा स्पर्धेत सहभाग घेतला. २००३ मध्ये एनएसएसए नॅशनल हेल्पिंग किड्स चॅम्पियन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत बेथानीने आपली योग्यता सिद्ध केली. त्यानंतर तिने २००४ मध्ये एएसपी वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतही आपल्या सर्फिंगची छाप सोडली. तिच्या या लढावू बाण्याचे जगभरात कौतुक झाले. अनेक टीव्ही शोमध्ये मुलाखत घेण्यात आली. तिच्यावर सोल सर्फर नावाचा चित्रपटही काढण्यात आला. या चित्रपटानंतर ती अनेकांची रोल मॉडेल झाली. अनेक पुरस्कारांनी तिला गौरविण्यातही आले. बेथानीच्या प्रेरणादायी प्रवासावर Soul Surfer: A True Story of Faith, Family, and Fighting to Get Back on the Board हे पुस्तकही लिहिले गेले. ‘हार्ट ऑफ सोल सर्फर’ नावाची डॉक्युमेंटरीनेही तिच्या लढावू बाण्याला सलाम केला आहे. शार्क हल्ल्यानंतर डावा हात गमावल्यानंतरही बेथानी सागरी लाटांना आव्हान देत आहे. विशेष म्हणजे गर्भवती असतानाही तिने एका हाताने सर्फिंग केली. तिच्या या धाडसापुढे जणू काही सागरही नतमस्तक झाला.
bethany hamilton surfer
bethany hamilton surfer

बेथानीविषयी हेही नसे थोडके...
  • वयाच्या १३ व्या वर्षी शार्कच्या हल्ल्यात बेथानी हॅमिल्टनला डावा हात गमवावा लागला.
    ............................................................
  • जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर काही महिन्यांतच बेथानी पुन्हा सर्फिंगकडे वळली
    ............................................................
  • तिच्या या धाडसी वृत्तीवर जगभरात ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली.
    ............................................................
  • तिच्या जीवनावर ‘सोल सर्फर’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
    ............................................................

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.