या खेळाडूच्या नावावर आहेत सात विश्वविक्रम!



Michael Phelps world recordMichael Fred Phelps II is an American retired competitive swimmer and the most successful and most decorated Olympian of all time, with a total of 28 medals.

      www.linkedin.com/in/maheshpathade03    

Michael Phelps World Record |
michael phelps world record
michael phelps world record
विश्वातला सर्वोत्तम जलतरणपटू मायकेल फेल्प्सचा जन्म ३० जून १९८५ रोजी अमेरिकेतील रॉजर फोर्जमध्ये झाला. ऑलिम्पिकमध्ये त्याच्या नावावर १८ सुवर्णपदकांसह एकूण २२ पदकांची नोंद आहे. जलतरणात त्याने सात विश्वविक्रम नोंदविले होते. मायकेल फेल्प्सविषयी अनेकांनी हे माहीत नाही, की २००६ मध्ये त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी सांगितले, की त्याला आता पाण्यात अजिबात उतरू देऊ नका. यानंतर दोनच वर्षांनी २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती. यामुळे मायकल फेल्प्सचे स्वप्न धुळीस मिळणार होते. त्याने डॉक्टरच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला, की मी पाण्यात जाणारच. पोहण्यासाठी हातांचा नाही, तर पायांचा उपयोग करीन. त्याच्या हितचिंतकांनी त्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की अरे बाबा, तुझा सामना शेजारपाजाऱ्यांशी नाही, तर विश्वातील सर्वोत्तम जलतरणपटूंशी आहे. त्यामुळे पायाने पोहण्याचा अट्टहास करू नकोस. मायकेलने कोणाचेही ऐकले नाही. त्याने सराव सुरूच ठेवला आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्णपदके जिंकत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या आठ सुवर्णपदकांमध्ये एक इव्हेंट १०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक या प्रकारचा होता. यात तो केवळ पायाच्या शेवटच्या स्ट्रोकमुळेच जिंकला. पायाने स्ट्रोक लावण्याच्या सरावाचा त्याला इथे फायदा झाला, ज्याला त्याचे हितचिंतक विरोध करीत होते. याच बीजिंग ऑलिम्पिकमुळे मायकेल फेल्प्स सर्वाधिक चर्चेत आला. त्याने मार्क स्पिट्झचा ३६ वर्षांपूर्वीचा म्हणजे १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमधील सात सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला.

मायकेल फेल्फ्सविषयी हे माहिती आहे काय?

  • Michael Phelps World Record | मायकेल फेल्प्सचा जन्म ३० जून १९८५ रोजी रिलँडच्या रॉजर फोर्ज (अमेरिका) येथे झाला. 
  • मायकेल फेल्प्सने पहिले ऑलिम्पिक पदक २००४ मध्ये अथेन्समध्ये जिंकले.
  • मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत २३ सुवर्णपदकांसह २८ पदके जिंकली आहेत. जागतिक स्पर्धेत त्याने २६ सुवर्णपदकांसह ३३ पदके जिंकली आहेत.
  • मायकेल फेल्फ्सचे पाय १५ डिग्रीने झुकलेली आहेत. त्यामुळे त्याला वेगाने पोहण्यास सहाय्यभूत ठरतात.
  • मायकेलची उंची सहा फूट ४ इंच आहे. त्याच्या नावावर सात विश्वविक्रमांची नोंद आहे.
  • ऑलिम्पिक स्पर्धेत उतरण्याचे मायकेल फेल्फ्सचे स्वप्न कदाचित धुळीस मिळाले असते. २००६ मध्ये त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी त्याला पुन्हा स्वीमिंग न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तो २००८ मधील बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेस मुकला असता. मात्र, जिद्दीच्या जोरावर तो बीजिंग ऑलिम्पिक खेळलाच नाही तर विश्वविक्रम प्रस्थापित केले. 
  • मायकेल फेल्प्सने १९७२ मधील म्युनिक ऑलिम्पिकमधील मार्क स्पिट्जचा ३६ वर्षांपूर्वीचा ७ सुवर्णपदकांचा विक्रम मोडीत काढला. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मायकेलने ८ सुवर्णपदके जिंकत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

Comments