किंग्स्टन
कोरोना विषाणूमुळे coronavirus | जगाला वेठीस धरलं आहे. या विषाणूच्या भीतीने जीवनशैलीच बदलली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनीही खेळणे थांबवले आहे. आता हेच पाहा ना, वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा ८ जुलैपासून आहे. या दौऱ्यात कसोटी मालिका होणार आहे. 25 जणांची कॅरेबियन टीम मंगळवारी इंग्लंडला पोहोचणार आहे. मात्र, या कॅरेबियन संघातील तीन क्रिकेटपटूंनी या दौऱ्यातून अंग काढून घेतले आहे. करोना विषाणूच्या फैलावामुळे डेरेन ब्राव्हो darren bravo |, शिमरोन हेटमायर shimron hetmyer | आणि किमो पॉल keemo paul | यांनी या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजचे cricket west indies | मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव यांनी ही माहिती दिली आहे. या तिन्ही खेळाडूंनी कुटुंबाची चिंता आहे.
क्रिकेट वेस्टइंडीजशी हे तिन्ही खेळाडू करारबद्ध आहेत. ग्रेव यांनी सांगितले, की या तिन्ही खेळाडूंच्या नकाराचे कारण समजू शकते आणि त्यांच्याविषयी सहानुभूतीही आहे. ते म्हणाले, ‘‘किमो पॉलचं मोठं कुटुंब असून, या कुटुंबात तो एकटाच कमावणारा आहे. त्यामुळे खूपच चिंतेत होता. त्याला वाटतं, की जर आपल्याला काही झालं तर कुटुंबाकडे कोण पाहील?’’
पॉलने क्रिकेट मंडळाला ई-मेल केला असून, त्यात त्याने दौऱ्यातून बाहेर पडण्याची विनंती केली आहे.
ग्रेव म्हणाले, ‘‘हा निर्णय खूपच कठीण असल्याचे पॉलने म्हंटले आहे. मात्र, कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर त्यांना सोडून खेळायला जाणे योग्य वाटत नाही.’’
ब्राव्होही ब्रिटनमधील परिस्थितीवर चिंतीत आहे. जेथे दोन लाख 70 हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, तेथे खेळायला जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
ग्रेव म्हणाले, ‘‘ब्राव्होनेही दौरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्याला पस्तावाही होत आहे. कारण देशासाठी खेळणे ही सन्मानाची बाब आहे.’’
Comments