ऑलिम्पिकमध्ये भारत का मागे आहे?
भारताने आतापर्यंत (२०२४ पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत) फक्त ८ क्रीडा प्रकारांमध्ये ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. १४5 कोटींचा देश, फक्त ८ खेळांत पदके! ऑलिम्पिकमध्ये भारत का मागे आहे? तब्बल १४5 कोटींचा देश, युवाशक्तीची प्रचंड ताकद, पण ऑलिम्पिकच्या इतिहासात हाच देश फक्त ८ खेळांत पदके मिळवतो. आश्चर्य व्यक्त करावं की खेद व्यक्त करावा की खंत? ऑलिम्पिकमध्ये भारत का मागे आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कोणत्याही पातळीवर होत नाही. आपण फक्त निम्म्याच नव्हे, किंबहुना त्यापेक्षा कमी क्रीडा प्रकारांत यश मिळवलं आहे. बाकीचे क्रीडा प्रकार तर आपल्यापासून कोसो दूर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे “कटू सत्य” सांगताना म्हटले आहे, की अर्ध्याहून अधिक प्रकारांत स्पर्धाच न केल्याने पदके मिळण्याची संधी गमावली जाते. अर्थात, त्यांनीच कधी तरी म्हंटलं होतं, की भारत क्रीडा क्षेत्रातही महाशक्ती बनेल. पण सरकार बनतात, आश्वासने देतात आणि नंतर तेच खंतही व्यक्त करतात. चालायचंच. मात्र, एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, की ऑलिम्पिकमध्ये निम्म्यापेक्षा अधिक क्रीडा प्रकारांत आपण कुठेच का नाही? याचाच आजच्या क्रीडा दिनानिमित्त खेळियाडने घेतलेला मागोवा.. ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत फक्त आठ क्रीडा प्रकारांत पदके मिळाली आहेत. उर्वरित अर्ध्याहून अधिक खेळांत सहभागच नाही. यामागची कारणे काय? प्रशिक्षण कुठे मिळते? ब्रेकिंगसारख्या नवीन खेळांची स्थिती काय? संपूर्ण माहिती जाणून घेऊया खेळियाडच्या आजच्या ब्लॉगमध्ये.
भारताने आतापर्यंत (२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत) फक्त ८ क्रीडा प्रकारांमध्ये ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.
या प्रकारांमध्ये :
- हॉकी (Field Hockey)- सर्वाधिक यशस्वी (१३ पदके, त्यात ८ सुवर्ण)
- ॲथलेटिक्स
- शूटिंग (नेमबाजी)
- कुस्ती (Wrestling)
- बॅडमिंटन
- भारत्तोलन (Weightlifting)
- बॉक्सिंग
- टेनिस
एकूण ४१ पदके (१० सुवर्ण, १० रौप्य, २१ कांस्य) याच आठ प्रकारांमधून जिंकली आहेत.
उन्हाळी ऑलिम्पिकमधील एकूण क्रीडा प्रकार
- 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 32 क्रीडा प्रकार (sports) होते. (काही प्रकारांत अनेक डिसिप्लिन/इव्हेंट्स असतात, एकूण- 329 इव्हेंट्स).
- भारताने त्यापैकी फक्त 16 मध्ये भाग घेतला.
त्यामुळे सुमारे २४ पेक्षा अधिक क्रीडा प्रकार असे आहेत, ज्यात भारताने अद्याप एकही पदक जिंकलेले नाही (किंवा अनेकदा भागच घेतलेला नाही). कदाचित यापैकी काही क्रीडा प्रकार अनेकांना माहीतही नसतील.
हे क्रीडा प्रकार पुढीलप्रमाणे-
- आर्चरी (तिरंदाजी)
- जिम्नॅस्टिक्स (कलात्मक, ऱ्हिदमिक, ट्रॅम्पोलिन)
- ज्यूदो
- टेबल टेनिस
- तायक्वांदो
- रोइंग, कनोइंग/कयाकिंग
- सायकलिंग (रोड, ट्रॅक, माउंटन, बीएमएक्स)
- जलतरण (स्विमिंग), डायव्हिंग, आर्टिस्टिक स्विमिंग, मॅरेथॉन स्विमिंग, वॉटरपोलो
- फुटबॉल, बास्केटबॉल (5x5 आणि 3x3), हँडबॉल, व्हॉलीबॉल, बीच व्हॉलीबॉल, रग्बी
- घोडेस्वारी (Equestrian), फेन्सिंग, मॉडर्न पेंटॅथलॉन, ट्रायथलॉन
- गोल्फ, सेलिंग
- स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग, सर्फिंग, ब्रेकिंग (नवीन प्रकार)
- आणि इतर अनेक
हिवाळी ऑलिम्पिक
हिवाळी ऑलिम्पिकमध्ये (7 मुख्य प्रकार) भारताने कधीही पदक जिंकलेले नाही. कमाल आहे ना? मुळात हिवाळी ऑलिम्पिक भारतासाठी नाहीच, असाच गैरसमज एकूण कामगिरी पाहता झाला आहे. थोडक्यात काय, तर उन्हाळी ऑलिम्पिकच्या 32 प्रकारांपैकी भारत फक्त 8 मध्ये यशस्वी झाला आहे. उर्वरित बहुतेक प्रकारांत भारत अजूनही मागे आहे- काही प्रकारांत भाग घेणेही दुर्मिळ आहे. इतर देशांशी भारताची तुलना करणे निरर्थक आहे. मात्र, भारताला ही स्थिती बदलायची असेल तर अधिक क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण, सुविधा आणि सहभाग वाढवावा लागेल. मात्र, ते तितके सोपेही नाही. कारण त्यासाठी भारताची समग्र स्थिती समजून घ्यावी लागेल.भारताला अनेक ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांत पदके न मिळण्याची मुख्य कारणे पुढीप्रमाणे आहेत :
१. क्रीडासंस्कृती आणि प्राधान्याचा अभाव
- भारतात खेळ हा शिक्षण आणि नोकरीच्या तुलनेत दुय्यम मानला जातो. पालक मुलांना डॉक्टर, इंजिनीअर किंवा सरकारी नोकरीकडेच जास्त प्रोत्साहित करतात.
- शाळांमध्ये खेळाची पद्धतशीर शिक्षणव्यवस्थेचा अभाव आहे आणि दुसरे म्हणजे प्रशिक्षकांची वानवा. मुलांना लहान वयात प्रतिभा ओळखून वाढवण्याची प्रणाली कमकुवत आहे.
२. पायाभूत सुविधा आणि प्रवेशाचा अभाव
- बहुसंख्य लोकसंख्येला (सुमारे १.३९ अब्ज) चांगल्या खेळाच्या सुविधांचा, मैदानांचा, उपकरणांचा आणि प्रशिक्षकांचा अभाव आहे. (सध्या मुंबईत मैदाने वाचवा म्हणून आंदोलन सुरू आहे. गंमत म्हणजे ज्या शहरांत मैदाने आहेत ती खेळासाठी वापरलीच जात नाहीत. त्याचेही कुणाला काही घेणेदेणे नाही)
- फक्त काही शहरांमध्ये किंवा विशिष्ट खेळांत (जसे हॉकी, शूटिंग, कुस्ती) सुविधा आहेत. अनेक क्रीडा प्रकारांत (जलतरण, जिम्नॅस्टिक्स, रोइंग, सायकलिंग इ.) आधारभूत सुविधाच नाहीत.
३. आर्थिक गुंतवणूक आणि प्राधान्य
- खेळावर सरकारी खर्च तुलनेने कमी आहे. चीन, अमेरिका, युरोपीय देशांप्रमाणे दीर्घकालीन राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली नाही. (ही वस्तुस्थिती माहीत असूनही पंतप्रधान मोदी खंत व्यक्त करतात)
- GDP वाढली असली तरी per capita उत्पन्न अद्याप कमी आहे. भांडवली क्रीडा प्रकार (स्विमिंग, सेलिंग, जिम्नॅस्टिक्स) महाग आहेत आणि त्यात भारताचे अस्तित्व नगण्य आहे.
४. कुपोषण आणि आरोग्य समस्या
- मुलांमध्ये स्टंटिंग (वाढ खुंटणे) आणि वेस्टिंग (तीव्र कुपोषण) चे प्रमाण जास्त आहे. Global Hunger Index मध्ये भारत मागे आहे.
- चांगले पोषण नसल्याने शारीरिक क्षमता आणि सहनशक्ती प्रभावित होते. ऑलिम्पिक स्तरावर आहार सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. जेथे दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, तेथे खेळाचे चोचले कोण पुरवणार?
५. भाग घेण्याची मर्यादा
- 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ३२ क्रीडा प्रकारांपैकी भारताने फक्त १६ मध्ये भाग घेतला होता. अनेक प्रकारांत (सर्फिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग, हिवाळी खेळ आदी) अजूनही स्पर्धकच पाठवले जात नाहीत.
- पंतप्रधान मोदींनीच हे “कटू सत्य” सांगितले, हे विशेष की अजब माहीत नाही, पण अर्ध्याहून अधिक प्रकारांत स्पर्धाच न केल्याने पदके मिळण्याची संधी गमावली जाते हेही तितकेच खरे.
६. प्रशासकीय आणि प्रणालीगत समस्या
- क्रीडा महासंघांमध्ये राजकारण, भ्रष्टाचार आणि जबाबदारीचा प्रचंड अभाव आहे. अनेक महासंघांच्या कार्यकारिणी कोर्टात बनतात, काही महासंघांचे कोर्टकज्जे तर वर्षानुवर्षे मिटलेले नाहीत.
- ग्रास रुट्स (शालेय पातळी) पासून टॅलेंट ओळखणे आणि वाढवणे आपल्याला माहीतच नाही. निधी उपलब्ध असला तरी तो प्रभावीपणे पोहोचत नाही किंवा वापरला जात नाही.
- सांघिक क्रीडा प्रकारांत (फुटबॉल, बास्केटबॉल आदी) समन्वयाचा अभाव स्पष्टपणे अधोरेखित होतो.
७. इतर सामाजिक घटक
- जात-वर्ग, लिंग आणि आर्थिक असमतोलामुळे अनेक संभाव्य खेळाडू स्पर्धेत येऊ शकत नाहीत.
- आपल्याकडे क्रिकेट म्हणजे तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं सारखं अगतिक आहे. यांसारख्या व्यावसायिक खेळांनाच जास्त लोकप्रियता आणि पैसा असल्याने इतर ऑलिम्पिक खेळांकडे दुर्लक्ष होते.
थोडक्यात काय, तर लोकसंख्या मोठी असून काही उपयोग नाही. आपल्याला हवीय “प्रभावी सहभागी लोकसंख्या”. ती तर खूपच कमी आहे. सुविधांचा अभाव, क्रीडासंस्कृतीचा अभाव, कुपोषण आणि मर्यादित सहभाग ही भारत मागे राहण्याची मुख्य कारणे आहेत. अलीकडे गुंतवणूक वाढली आहे (Khelo India, TOPS योजना), पण रिझल्ट कुठे? या योजना म्हणजे निवडक खेळाडूंवर प्रचंड खर्च, पण ग्रास्स रुट्स पातळीवर आणि नवीन क्रीडा प्रकारांत दीर्घकालीन काम कुठे होतंय? पॅरिस २०२४ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये एकूण ३२ क्रीडा प्रकार होते. भारताने त्यापैकी फक्त १६ मध्ये स्पर्धक पाठवले. त्यामुळे १६ क्रीडा प्रकारांत भारताची उपस्थितीच नव्हती. असली तरी ती अत्यंत नगण्य. भारताने अद्याप स्पर्धकच पाठवू न शकलेले किंवा कधीही भाग न घेतलेले प्रमुख प्रकार पंतप्रधान मोदींनीही याचा उल्लेख केला आहे. त्यापैकी काही उदाहरणे:
- सर्फिंग (Surfing) - कधीही भारतीय स्पर्धक पाठवलेला नाही
- स्पोर्ट क्लाइंबिंग (Sport Climbing) - कधीही भारतीय स्पर्धक नाही
- स्केटबोर्डिंग (Skateboarding)
- ब्रेकिंग (Breaking / Breakdancing) - २०२४ मध्ये हा नव्यानेच दाखल झालेला क्रीडा प्रकार आहे. (या खेळाची माहिती खाली दिली आहे)
- बेसबॉल / सॉफ्टबॉल
- हँडबॉल
- रग्बी (Sevens)
- बास्केटबॉल (5x5 आणि 3x3 दोन्ही)
- व्हॉलीबॉल आणि बीच व्हॉलीबॉल
- फुटबॉल - १९६० नंतर भारत कधीच क्वालिफाय झालेला नाही
- कॅनो स्लॅलम आणि कॅनो स्प्रिंट (बहुतेक वेळा अनुपस्थित)
- सायकलिंगचे बहुतांश प्रकार (BMX, माउंटन बाइक, ट्रॅक, रोड यात क्वचितच सहभाग राहिलेला आहे. म्हणजे एक-दोनच स्पर्धक)
- जिम्नॅस्टिक्स (कलात्मक, ऱ्हिदमिक, ट्रॅम्पोलिन)
- डायव्हिंग, आर्टिस्टिक स्विमिंग, मॅरेथॉन स्विमिंग, वॉटर पोलो
- मॉडर्न पेंटॅथलॉन
- ट्रायथलॉन
- फेन्सिंग (अलीकडेच पहिला स्पर्धक)
- तायक्वांदो
- ज्यूदो | १
- रोइंग | १
- घोडेस्वारी | १
- भारत्तोलन | १
- जलतरण (स्विइमिंग) | २
- सेलिंग | २
- टेनिस | ३
- गोल्फ | ४
१. सरकारी सुविधा: Sports Authority of India (SAI)
SAI देशभरात प्रशिक्षण व्यवस्था चालवते. तिची मुख्य संरचना अशी आहे:- National Centres of Excellence (NCOE) - सुमारे २४ केंद्रे (एलिट खेळाडूंसाठी)
- SAI Training Centres (STC) - सुमारे ६७-६९ केंद्रे (१०-१८ वर्षे वयोगटासाठी)
- प्रादेशिक केंद्रे - बेंगळुरू, कोलकाता, गांधीनगर, मुंबई, भोपाळ, सोनिपत, लखनौ, चंडीगड, गुवाहाटी, इम्फाळ आदी.
- विशेष केंद्रे - पतियाळा (NSNIS), तिरुवनंतपुरम (LNCPE) आदी.
काही प्रमुख NCOE आणि तेथे मिळणारे खेळ:
केंद्र | मुख्य खेळ- बेंगळुरू | ॲथलेटिक्स, हॉकी, भारत्तोलन, तायक्वांदो
- सोनिपत | आर्चरी, ॲथलेटिक्स, हॉकी, कबड्डी, कुस्ती
- पतियाळा | ॲथलेटिक्स, सायकलिंग, फेन्सिंग, हॉकी, ज्यूदो, भारत्तोलन
- इम्फाळ | आर्चरी, ॲथलेटिक्स, सायकलिंग, फुटबॉल, हॉकी, भारत्तोलन, वुशू
- भोपाळ | ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, हॉकी, ज्यूदो, कयाकिंग
- कोलकाता | आर्चरी, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, टेबल टेनिस
- तिरुवनंतपुरम | ॲथलेटिक्स, सायकलिंग, फुटबॉल, फेन्सिंग, तायक्वांदो, व्हॉलीबॉल
- आलेप्पी / जगत्पूर | रोइंग, कयाकिंग आणि कनोइंग
- छत्रपती संभाजीनगर | बॉक्सिंग, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, भारत्तोलन
- मुंबई | हॉकी, कबड्डी, कुस्ती
- सोनिपत | आर्चरी, ॲथलेटिक्स, हॉकी, कबड्डी, कुस्ती
- पतियाळा | ॲथलेटिक्स, सायकलिंग, फेन्सिंग, हॉकी, ज्यूदो, भारत्तोलन
- इम्फाळ | आर्चरी, ॲथलेटिक्स, सायकलिंग, फुटबॉल, हॉकी, भारत्तोलन, वुशू
- भोपाळ | ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, हॉकी, ज्यूदो, कयाकिंग
- कोलकाता | आर्चरी, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, टेबल टेनिस
- तिरुवनंतपुरम | ॲथलेटिक्स, सायकलिंग, फुटबॉल, फेन्सिंग, तायक्वांदो, व्हॉलीबॉल
- आलेप्पी / जगत्पूर | रोइंग, कयाकिंग आणि कनोइंग
- छत्रपती संभाजीनगर | बॉक्सिंग, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, भारत्तोलन
- मुंबई | हॉकी, कबड्डी, कुस्ती
२. Khelo India योजना
- राज्य आणि जिल्हा पातळीवर शेकडो केंद्रे
- Khelo India State Centres of Excellence आणि अकादमी
- लहान वयापासून टॅलेंट ओळखून प्रशिक्षण
३. खासगी आणि विशिष्ट खेळांच्या उत्कृष्ट अकादमी
- बॅडमिंटन : पुल्लेला गोपीचंद अकादमी, प्रकाश पदुकोन अकादमी (हैदराबाद, बेंगळुरू)
- ॲथलेटिक्स : Inspire Institute of Sport (IIS), PT Usha Academy, Reliance Athletics HPC (बेल्लारी (कर्नाटक), केरळ, भुवनेश्वर)
- बॉक्सिंग : Inspire Institute of Sport, मेरी कोम अकादमी (बेल्लारी, इम्फाळ)
- कुस्ती : Inspire Institute of Sport, SAI सोनिपत (बेल्लारी, सोनिपत)
- फुटबॉल : टाटा फुटबॉल अकादमी, Reliance Foundation Young Champs (जमशेदपूर, नवी मुंबई)
- क्रिकेट : National Cricket Academy (NCA) (बेंगळुरू)
- टेनिस : रोहन बोपन्ना / महेश भूपती अकादमी आदी (बेंगळुरू, चेन्नई)
- शूटिंग : Dr. Karni Singh Shooting Range + SAI (दिल्ली)
- जलतरण : काही SAI केंद्रे + खासगी क्लब (विविध शहरे)
प्रशिक्षणाची सुविधा कशी आहे?
- चांगली असलेली ठिकाणे: पतियाळा, बेंगळुरू, सोनिपत, इम्फाळ, IIS बेल्लारी, गोपीचंद अकादमी - येथे जागतिक दर्जाचे कोच, स्पोर्ट्स सायन्स लॅब, आधुनिक उपकरणे आणि न्यूट्रिशन सपोर्ट आहे.
- उणिवा काय?: अनेक लहान STC आणि ग्रामीण केंद्रांत सुविधा मध्यम दर्जाच्या आहेत. प्रशिक्षकांची संख्या कमी, काही खेळांत (सर्फिंग, क्लाइंबिंग, ॲक्वाटिक्स) सुविधाच दुर्मिळ.
- प्रवेश : बहुतांश ठिकाणी ट्रायल्स, स्कॉलरशिप किंवा Khelo India/SAI निवडीद्वारे. खासगी अकादमींमध्ये फी असते (महिन्याला हजारो ते लाखांत), पण शिष्यवृत्ती मिळू शकते.
मुख्य स्थिती (२०२४-२६ नुसार)
| क्रीडा प्रकार | प्रशिक्षणाची सद्यःस्थिती | प्रमुख ठिकाणे / सुविधा | वस्तुस्थिती | | सर्फिंग | खासगी सर्फ स्कूल पातळीवर | मुळकी (मेंगलुरू), गोवा, पुद्दुचेरी, कोव्हलम, अंदमान | सरकारी/SAI सुविधा नाही. फक्त पर्यटन/गमतीच्या पातळीवर | | स्पोर्ट क्लाइंबिंग | काही इनडोअर वॉल्स आणि IMF संलग्न केंद्रे | पुणे, दिल्ली, कोइम्बतूर, उत्तराकाशी (NIM), पिंपरी-चिंचवड | ऑलिम्पिक दर्जाची सुविधा फार कमी. आर्थिक मदत दुर्मिळ | | स्केटबोर्डिंग | काही स्केटपार्क आणि अकादमी | चंदीगड, दिल्ली, राजस्थान (Desert Dolphin), मुंबई, ग्रामीण (जनवार, प्रोटोव्हिलेज) | सरकारी समर्थन नगण्य. मुख्यतः खासगी/समुदाय आधारित | | ब्रेकिंग | जवळपास शून्य | काही शहरांत डान्स स्टुडिओ | ऑलिम्पिक प्रकार म्हणून अजून पायाच नाही | | हँडबॉल | SAI/NCOE मध्ये मर्यादित | गांधीनगर NCOE, काही STC | सहभाग नगण्य असल्याने उच्च स्तरीय प्रशिक्षण कमकुवत | | रग्बी | फार मर्यादित | काही क्लब आणि अकादमी | राष्ट्रीय संघासाठीही पायाभूत सुविधा अपुरी | | बास्केटबॉल (5x5/3x3) | SAI आणि खासगी क्लब | काही प्रादेशिक केंद्रे, शहरे | ऑलिम्पिक क्वालिफिकेशनसाठी प्रणाली कमकुवत | | कनोइंग / कयाकिंग | चांगली सुविधा काही ठिकाणी | आलेप्पी, जगत्पुर (ओडिशा), भोपाळ | रोइंगसोबत चांगले, पण व्यापक नाही | | जिम्नॅस्टिक्स | काही NCOE आणि STC | औरंगाबाद, कोलकाता, दिल्ली | कलात्मक जिम्नॅस्टिक्ससाठी सुविधा मर्यादित | | फेन्सिंग | वाढत आहे | गुवाहाटी, पतियाळा, इम्फाळ, छत्रपती संभाजीनगर | अलीकडे सुधारणा, पण अजूनही मर्यादित | | ॲक्वाटिक्स (डायव्हिंग, आर्टिस्टिक स्विमिंग, वॉटर पोलो) | फार कमकुवत | काही स्विमिंग पूल | बहुतेक प्रकारांत सुविधाच नाही |एकूण चित्र
- सरकारी पातळीवर (SAI/NCOE/STC): या प्रकारांसाठी विशेष लक्ष कमी. SAI चे बहुतांश केंद्रे पारंपरिक यशस्वी खेळांवर (ॲथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, शूटिंग, बॉक्सिंग) केंद्रित आहेत.
- खासगी/समुदाय पातळी : सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि क्लाइंबिंगमध्ये खासगी उपक्रम वाढत आहेत, पण ते पर्यटन किंवा हॉबी पातळीवर जास्त आहेत. उच्चस्तरीय (एलिट) प्रशिक्षण, स्पोर्ट्स सायन्स, न्यूट्रिशन आणि आंतरराष्ट्रीय एक्सपोजर फार कमी.
मुख्य अडथळे :
- पायाभूत सुविधा (विशेषतः इनडोअर/ओपन वॉटर) अपुरी
- प्रशिक्षक आणि कोचिंग सिस्टीम कमकुवत
- निधी आणि शिष्यवृत्ती फार कमी
- राष्ट्रीय फेडरेशनची सक्रियता आणि स्काउटिंग प्रणालीचा अभाव
भविष्यातील शक्यता
पंतप्रधान मोदींनी अलीकडे सर्फिंग आणि स्पोर्ट क्लाइंबिंगसारख्या प्रकारांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. भारताला लांब किनारा आणि डोंगराळ प्रदेश असल्याने नैसर्गिक लाभ आहे, पण त्यासाठी व्यवस्थित इकोसिस्टम (सुविधा + कोचिंग + स्पर्धा) उभारणे गरजेचे आहे.ब्रेकिंग (Breaking) म्हणजे काय?
- उत्पत्ती : १९७० च्या दशकात न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स भागात हिप-हॉप संस्कृतीतून जन्माला आला.
- ऑलिम्पिकमध्ये प्रवेश : पॅरिस २०२४ मध्ये प्रथमच हा खेळ समाविष्ट झाला. (२०१८ च्या यूथ ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झाल्यानंतर).
- लॉस एंजिल्स २०२८ मध्ये हा खेळ समाविष्ट नव्हता.
ब्रेकिंग खेळ कसा असतो?
- पुरुषांना B-Boys आणि महिलांना B-Girls म्हणतात
- स्पर्धा वन-ऑन-वन बॅटल स्वरूपात होते
- एक स्पर्धक संगीत सुरू झाल्यावर सुमारे ४५-६० सेकंद नृत्य करतो, नंतर दुसरा स्पर्धक लगेच प्रतिसाद देतो
- संगीत आधीच ठरलेले नसते. DJ लाइव्ह प्ले करतो. त्यामुळे इम्प्रोव्हायझेशन (तत्काळ रचना) महत्त्वाची असते
मुख्य घटक (Elements)
- Toprock - उभे राहून केलेली पावले आणि हालचाली.
- Downrock / Footwork - जमिनीवर हातपाय वापरून केलेली जटिल पावले
- Power Moves - ॲक्रोबॅटिक फिरणे (Windmill, Headspin, Airflare आदी).
- Freezes - शरीराची कठीण पोझिशन ठेवून थांबणे
ब्रेकिंग खेळाचा निकाल कसा दिला जातो?
- Technique (तंत्र)
- Vocabulary (हालचालींची विविधता)
- Execution (अंमलबजावणी)
- Musicality (संगीताशी समन्वय)
- Originality / Creativity (मूळपणा आणि सर्जनशीलता)
Comments