Inspirational Sport story
या चार खेळाडूंची कहाणी बदलून टाकेल तुमचे आयुष्य
September 30, 2019 ·
· comments
जीवन जगण्याची कला ज्याला उमजली त्याला संकटे खूपच क्षुल्लक वाटतात. अमुक गोष्ट माझ्याकडे नव्हती म्हणून मी पुढे जाऊ शकलो नाही, अशी उत्तरे जेत्यांच्या तोंडी कधीच ऐकायला मिळणार नाही. अत्यंत खडतर आयुष्यातही ज्यांनी यशाच्या समृद्धीचं माळरान फुलवलं, त्यांची ही प्रेरणादायी जीवनकहाणी. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांची उत्तुंग भरारी कोणी रोखली नाही. असं काय केलं असेल या खेळाडूंनी?
Follow me :
संकटांना पराभूत करणारा जिम्नॅस्ट
 |
| कायरन बेहान (Kieran Behan) : जीवघेण्या अपघातातूनही बाहेर येत जिम्नॅस्टिक्समध्ये छाप उमटवणारा खेळाडू |
संकटे कोणाला चुकली नाहीत...? काही जणांनी संकटांनाच संधी मानले; पण त्याच्या आयुष्यात अशा जीवघेण्या संकटांची मालिका सुरू झाली, की ही संकटेच त्याच्या प्रत्येक संधीत बाधा ठरत गेली. एकूणच काय, तर सगळ्या संधींवरच घाव घालणारी ही संकटे होती. मात्र, त्यावर मात करीत त्याने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. ही कहाणी आहे कायरन बेहान (Kieran Behan) या इंग्लंडमधील जन्मलेल्या एका आयरिश जिम्नॅस्टची, ज्याने ऑलिम्पिकमध्ये मजल मारली.
हात गमावल्यानंतरही सर्फिंग करणारी ही महिला खेळाडू कोण?
 |
| American professional surfer |
सागरी लाटांना आव्हान देणाऱ्या
बेथानी हॅमिल्टनची (Bethany Hamilton) कहाणी जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील हवाई येथे जन्मलेली बेथानी एक उत्तम सर्फर आहे. वयाच्या वयाच्या १३ व्या वर्षी तिच्यावर एक भयंकर प्रसंग गुदरला. २००३ मध्ये मित्रासोबत सकाळी सर्फिंगचा आनंद लुटताना एका अजस्त्र शार्कने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शार्कने तिचा डावा हात खांद्यापासूनच विलग केला.
मग पुढे काय झाले...?
 |
| मुहम्मद अली |
जगातला सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून
मुहम्मद अलीचा (Muhammad Ali) लौकिक आहे. ‘दि ग्रेटेस्ट’ या नावानेही तो ओळखला जातो. मात्र, मुष्टियोद्धा बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. गुलामीविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्याला वडिलांकडून मिळाली. त्यामुळेच त्याने आपल्या कारकिर्दीत ४० गुलामांना मुक्त केले होते. त्याने गुलामीविरोधी वृत्तपत्राचे संपादनही केले. अलीने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला.
त्यामागे काय कारण होते...? का झाला तो बंडखोर?
या खेळाडूच्या नावावर आहेत सात विश्वविक्रम!
डॉक्टरांनी सांगितले, की त्याला आता पाण्यात अजिबात उतरू देऊ नका. त्याने डॉक्टरच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला, की मी पाण्यात जाणारच. पोहण्यासाठी हातांचा नाही, तर पायांचा उपयोग करीन. त्याने मार्क स्पिट्झचा ३६ वर्षांपूर्वीचा म्हणजे १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमधील सात सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला.
Comments